Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

5 कोटींचे खेकडे निर्यात करणाऱ्या गुणाबाई

1/14/2016

 
मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपण शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दाखवून दिलंय नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार या महिलेनं…महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त नैसर्गिकरित्या खेकड्यांचे उत्पादन करणारं राज्य आहे. याचाच फायदा घेत गुणाबाईंनी खेकड्यांची निर्यात करत परदेशातील बाजारपेठ गाठली आहे.

या आहेत नवी मुंबईतील वाशी गावात राहणार्‍या गुणाबाई…शिक्षण फक्त पहिली…पण वयाच्या 8 व्या वर्षांपासून खेकडे पकडण्यात त्या अगदी माहिर.. 40 वर्षांपासून गुणाबाई नवी मुंबईतील खाडी किनार्‍यावर फळीवरुन खेकडे पकडून मुंबईत विकायच्या…सुरुवातीला सव्वा रूपयात एक डझन खेकडे विकणारी गुणाबाई आज वर्षांकाठी 5 कोटी रुपयांची खेकड्यांची निर्यांत करते. विशेष म्हणजे वडील पती भावंड या कोणाची साथ नसताना ही मजल गुणाबाईने गाठलीये.

नवी मुंबईतील खाडी किनार्‍यालगत असलेल्या तलावात गुणाबाई राज्यभरातील कच्चे खेकडे सोडून पारंपरिक पद्धती हा व्यवसाय करतात. यातून त्यांना 4 महिन्यात अडीच ते तीन किलोचे पक्के खेकडे मिळतात आणि नंतर याच खेकड्यांवर स्वत:च्या कोल्डस्टोरेजमध्ये प्रक्रिया करून निर्यात केली जाते.
महाराष्ट्रातला 100 टन खेकड्याचा कच्चा माल आंध्रप्रदेशात जात होता. आणि तिथे खेकडे पक्के करून चेन्नई मार्गे निर्यात होत होती. पण आता या पैकी 70 ते 80 टन खेकडा गुणाबाई आणि तिचा मुलगा सुभाष निर्यात करतात.

कोकण किनारपट्टीवर खेकड्यांच्या उत्पादनाला पोषक वातावरण आहे. नवी मुंबईतील पाचशे तलावांची एमपेडाच्या माध्यमातून पाहणी झालीये. या सर्व तलावातून शेकडो टन खेकड्याच उत्पादन होवू शकतो.
आज गुणाबाई 100 ग्रँमचे कच्चे खेकडे घेवून तीन किलोचे पक्के खेकडे तयार करते. तेव्हा त्यांना एका किलो मागे 30 डॉलर मिळतात. जर महाराष्ट्र सरकारने तामिळनाडू सरकार प्रमाणे सुविधा दिल्यातर महाराष्ट्र खेकडे निर्यातीमध्ये अव्वल स्थानी असेल. कारणं परदेशात महाराष्ट्रातल्या खेकड्यांना मागणी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना रोजगारही नवीन संधी उपलब्ध होईल.

-विनय म्हाञे, नवी मुंबई
Source : http://www.ibnlokmat.tv/archives/19970


GO BACK TO LIST
CATEGORIES

फ्लिप युवर बिझिनेस आयडिया

1/14/2016

 
Picture
गेल्या काही वर्षात 'स्टार्टअप' हा जगभरात एक चलनी नाण्याप्रमाणे परवलीचा शब्द झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अलीकडेच'स्टार्टअप इंडिया,स्टँडअप इंडिया' ही महत्त्वाकांक्षी घोषणा केली. गेल्या काही वर्षांतील स्टार्टअप संबंधीचा काही अहवाल बघितले, तर एकूणचं स्टार्टअप उद्योगांचे वाढते महत्व लक्षात येऊ शकतं.

सर्वसाधारणपणे 'स्टार्टअप' म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कसलाही अनुभव नसताना केवळ कल्पकतेच्या भांडवलावर तरूणांनी सुरु केलेला उद्योग-व्यवसाय. आज तरूणांनी त्यांच्या 'लॅपटॉप'ला मुख्य ऑफिस, 'मोबाईल फोन'ला सेल्समन आणि 'कॉलेज-कट्ट्याला' कल्पनांसाठीची २४x७ 'लॅबोरेटरी'म्हणून कार्यरत केलेली दिसते. त्याच बरोबर घराघरांत पोहोचलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून घरातील लाखो गृहिणीदेखील जगभरातील हजारो-लाखो लोकांशी एका क्लिकद्वारे 'कनेक्ट' झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप सारख्या सोशल मीडियामुळे चक्कं पैसेही मिळवित आहेत. यात अगदी घरी बनविलेल्या दहा रुपयांच्या केकपासून कुठल्याही क्रिएटिव्ह वस्तूपर्यंत आणि ऑटो कार्स ते मोठमोठ्या क्रेन पर्यंत - कॅश किंवा क्रेडिट कार्डद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आज जगभरातून 'स्टर्टअप'ला सरकारी आणि मुख्य म्हणजे एकूणच समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर याचा बोलबाला झाला नसता तरच नवल.

स्टर्टअपमध्ये ज्या तरूणांनी यात यश मिळवलंय त्यांच्या कल्पक प्रयत्नांच्या प्रवासाचा नीट अभ्यास केला, तर त्यातून शिकण्यासारखं खूप आहे. आजच्या तरूण-तरूणींनी बरोबर कुणालाही आणि कुठल्याही वयात कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वतंत्र विश्व उभं करता यावं या हेतूनेच 'स्टर्टअप' या लेखमालेचा प्रपंच.

'फ्लिपकार्ट', २००७ साली सुरू झालेली एक छोटी ई-बुक रिटेलर कंपनी. आज ती जगभरात ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रस्थापित 'प्लेअर' म्हणून ओळखली जाते. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघे आयआयटीतील इंजिनिअर मित्र तिचे संस्थापक. आडनाव एकच असले तरी त्यांचे एकमेकांशी नाते नाही, मात्र ते दोघेही लहानपनापासूनचे मित्र. दोघेही 'अमेझॉन' या ई-कॉमर्स कंपनीमध्ये एकत्र आले. पुढे ही नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हे दोघेही मारवाडी समाजातील. आपला काय सगळ्यांचाच समज की, गुजराती-मारवाडी समाजात उद्योग सुरू करायला कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळते. पण बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी समोर असेल, तर तिथेही विरोध होणे साहजिकच. शेवटी व्यवसाय जमला नाही, तर पुन्हा नोकरी करू या बोलीवर त्यांना घरून संमती मिळाली.

'फ्लिपकार्ट'ची स्थापना ही खरेतर खूप विचार वा अभ्यास करून झालेली नाही. साधारण ७-८ वर्षांपूर्वीपर्यंत ई-कॉमर्स क्षेत्रात असणाऱ्या कंपन्या सुमार दर्जाची सेवा पुरवत होते. त्यामुळे यांच्यापेक्षा उत्कृष्ट ग्राहक सेवा देणे हे प्रथम उद्दिष्ट ठरवून सचिन आणि बिन्नी यांनी स्वतःच्या खिशातील प्रत्येकी २-२ लाख रुपये गुंतवून 'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन सेवेची सुरुवात केली. पहिले दहा दिवस त्याला कुणीच प्रतिसाद दिला नाही. मग बन्सल द्वयींनी बंगळूरूच्या गंगाराम बुक स्टोअरबाहेर उभे राहून प्रत्येकाला फ्लिपकार्टचा बुकमार्क वाटायला सुरुवात केली. हा अनुभव फारसा उत्साहवर्धक नव्हता. पण यातून आपल्याला नेमकं कुठे आणि काय बदलायचंय हे त्यांना समजलं. ई-कॉमर्सच्या क्षेत्रात पाय रोवताना ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याबरोबरच व्यवहार कमी वेळेत व किमान मूल्यात कसे होतील, तसेच ग्राहकसेवा दर्जेदार कशी राहील, यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं.

२००७पर्यंत भारतात नेटचा चांगला प्रसार झाला होता. लोकांनी बँकेचे, पैशांचे व्यवहार नेटवरून करायला सुरुवात केली होती. इतकेच काय वधू-वर संशोधनाचे कामही नेटवरून सुरू झाले होते. पण वस्तू न पाहताच लोक नेटवरून ती खरेदी कशी करणार? ऑर्डर आणि पैसे एकदम दिले आणि वस्तू आलीच नाही तर? इथे या बन्सलद्वयांची कल्पकता कामी आली. सुरुवातीला'फ्लिपकार्ट'तर्फे फक्त पुस्तके विकायला सुरुवात केली. लोक हवे तेच पुस्तक घेणार. त्याची किंमतही निश्चित असते. त्यात फसवणूकीचा धोका नाही. लोक हळूहळू ऑर्डर द्यायला लागले. जम बसत गेला.

आता फ्लिपकार्टला पुरवठादारांचा विश्वास संपादन करणे गरजेचे होते. फ्लिपकार्ट स्वत: उत्पादन करत नाही. उत्पादकांकडून वस्तू विकत घेणेआणि नफा घेऊन ते विकणे हा व्यवसाय. तसेच ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर लगेच तो त्यांच्याकडे पोचवायचा तर डिलिव्हरी सिस्टीम चोख हवी. यासाठी फ्लिपकार्टने 'वेअरहाऊस मॉडेल' राबवले. वेअरहाऊस म्हणजे सर्व उत्पादने एका ठिकाणी ठेवण्याची जागा. फ्लिपकार्टकडे प्रत्येक उत्पादनाची सविस्तर माहिती, त्याची यादी असते. त्याला 'इनव्हेन्टरी' असं म्हणतात. विक्रीच्या आलेखावरून किती उत्पादने आवश्यक आहेत आणि कितीची विक्री होणार आहे, याचा आराखडा ठरवला जातो. ही घडी बसायला वेळ लागला. पण त्यात बस्तान बसल्यावर प्रगती होत राहिली.

पुढचं आव्हान फक्त फ्लिपकार्टच नव्हे, तर अन्य ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट कंपन्यांचा कस पाहणारी होती. त्यावेळी सगळेच लोक डेबिट-क्रेडिट कार्डने व्यवहार करणारे नव्हते. मग जे नेट पेमेंट करू शकत नाहीत,त्यांच्यासाठी फ्लिपकार्टने प्रथमच कॅश ऑन डिलिव्हरीची (सीओडी) सोय उपलब्ध करुन दिली. या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे ऑनलाईन खरेदी-विक्रीची गती खऱ्या अर्थाने वाढली. आज ई-कॉमर्स क्षेत्रात सीओडी हुकूमाचा एक्का ठरली आहे.

आज ई-कॉमर्सने आपल्या जगण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. यूएसच्या मोटोरोला कंपनीने मोटो-जी हा स्मार्ट फोन लॉंच करताना भारताला पर्यायाने फ्लिपकार्टला अग्रक्रम दिला होता. Xiaomi Mi३ या स्मार्टफोनचीही केवळ २० हजार फोन्सची फ्लिपकार्टवर जेव्हा दुसऱ्यांदा नोंदणी झाली तेव्हा अक्षरशः ५ सेकंदात फोनची विक्री झाली. हे दुसरं-तिसरं काही नसून ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव आहे.

'फ्लिपकार्ट' ही रिटेल व्यवसायात असलेली, मात्र फक्त ऑनलाईन खरेदी-विक्री करणारी कंपनी. अनेकांनी या कंपनीबरोबर व्यवहार केला असेल आणि त्यांना तिचा प्रत्यक्ष अनुभव असेल. जे सहसा ऑनलाईन खरेदी करत नाहीत, त्यांनीही ह्या कंपनीविषयी नक्कीच ऐकलेले असेल. ही इतकी चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ज्या गतीने व ज्या मोठ्या प्रमाणात ती भांडवल गोळा करतआहे किंबहुना तिला ते मिळत आहे ते सारेच अचंबित करण्यासारखेच आहे. मे २०१४ मध्ये फ्लिपकार्टने डिएसटी ग्लोबलकडून २१ कोटी डॉलर्सचे भांडवल मिळवले. जुलै २०१४ मध्ये त्यांच्या आधीच्याचगुंतवणूकदार कंपन्या टायगर ग्लोबल आणि नॅस्पर्सकडून १०० कोटी डॉलर्सचे भांडवल त्यांना मिळाले. मे २०१५ मध्ये पुन्हा ५५ कोटी डॉलर्सचे भांडवल मिळाले. हे परदेशी गुंतवणूकदार इतका वारेमाप पैसा या कंपनीत ओतत आहेत याचा अर्थ त्यातून त्यांना भरपूर फायदा मिळेल, याची खात्री वाटत आहे.

उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि त्यामुळे वाढलेल्या लोकप्रियतेतूनच अनेक'ऑफलाइन' खरेदीदारांना 'ऑनलाइन' शॉपर्स बनवण्यात फ्लिपकार्टने मोठं यश मिळवलं आहे. फ्लिपकार्टचे फेसबुकवर सर्वाधिक म्हणजे साडे पाच लाखांहून अधिक फॅन्स आहेत. तर ट्विटरवरही सुमारे अडीच लाख फॉलोअर्स आहेत. हा वाढता प्रतिसाद 'कॅश' करत पुस्तकांशिवाय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फॅशन आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स, कार इलेक्ट्रॉनिक अॅन्ड अॅक्सेसरीज आज फ्लिपकार्टने उपलब्ध करून दिल्या आहेत. आज विविध ऑफर्सद्वारे प्रत्येक मिनिटाला फ्लिपकार्टवरून १५ पेक्षा अधिक वस्तू विकल्या जातात. रोजची विक्री १.५ कोटी रुपयांची आहे. 'हर विश पुरी' करणाऱ्या फ्लिपकार्टने आता'फ्लाईट' या पोर्टलद्वारे डिजिटल क्षेत्रातही आपला विस्तार केला आहे.'फ्लाईट'द्वारे युजर्स ५५ भाषांतील ७०० स्टाईलपैकी त्यांच्या आवडीचं एम पी थ्री फॉरमॅटमधील संगीत शुल्क भरून ऐकू शकतात. डिजिटल राईटस मॅनेजमेंट फ्री असलेली ही गाणी अन्य कुठल्याही उपकरणावर असंख्य वेळा ऐकता येतात.

जवळपास २०,००० कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याऱ्या फ्लिपकार्टचा २०१६च्या मध्यापर्यंत न्यूयॉर्क स्टोक एक्सेंज मधील आयपीओद्वारे सुमारे ५ बिलियन यूएस डॉलर्स उभारण्याचा मानस आहे. एका भारतीय कंपनीकडून ही आजवरची सर्वात मोठी पब्लिक ऑफर असेल आणि त्यानंतर कंपनीचे मूल्य ३० बिलिअन यूएस डॉलर्सच्या वर जाईल. अलीकडेच फ्लिपकार्टने मंत्रा डॉट कॉम, चंपक डॉट कॉम, लेट्स बाय डॉट कॉम, वुई रिड, मिमी ३६० यांसारख्या ई-कॉमर्समधील अन्य कंपन्या विकत घेतल्या आहेत. याच फ्लिपकार्टला भविष्यात १०० बिलियन डॉलर्सचं मूल्य असलेली बलाढ्य कंपनी बनायचं आहे. उद्दिष्ट पक्क ठरलंय आणि त्यादृष्टीने पावलं टाकायलाही सुरुवात झाली आहे. फ्लिपकार्टच्या संस्थापाकांमध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास,धडाडी, बोलेन ते खरं करून दाखवण्याची धमक, कार्यक्षम अंमलबजावणी आणि कल्पकता या गुणांमुळे ते हा टप्पाही सहज साध्य करतील.
परंपरागत विचार मागे सारत 'फ्लिपकार्ट'ने स्टार्टअप क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या भारतीय तरुणांना कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर व्यवसाय करण्याची, स्वप्नांच्या पंखांना नक्कीच नवी फ्लिप देणारी आहे यात शंका नाही..
पुढच्या भागात अशाच एका 'बेवकूफ' बिझनेसविषयी...

- नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉंयर
nitinpotdar@yahoo.com  
महाराष्ट्र टाईम्स: दिनाक 2 जानेवारी 2016 



GO BACK TO LIST
CATEGORIES

उद्योगाचा शुभारंभ!

12/10/2015

 
Picture

‘मंगेश (म्हणजे पूर्वीचा मोरू) अरे यंदाच्या दिवाळीला पदवीधर होऊन तुला सहा महिने झाले, अजूनही तू तुझा बायोडेटा तयार केलेला नाहीस. त्याशिवाय तू नोकरीसाठी अर्ज कसा करणार?’ मंगेशचे पप्पा (म्हणजे पूर्वीचा मोरूचा बाप) मंगेशला उद्देशून म्हणाले, ‘नाही! काय वाटेल ते झालं तरी मी नोकरीसाठी अर्ज तयार करणार नाही आणि कुणाला नोकरीसाठी भेटणारसुद्धा नाही, मग ती मॅनेजरची का असेना.’ इति मंगेश. मंगेशचे पप्पा चकीत झाले, डोक्यातला संताप लपवत, दिवाळीच्या तोंडावर वाद नको म्हणून विनोदाने घेत म्हणाले, ‘का बरं लॉटरी वगैरे लागली आहे का? की कोणी घरजावई करून घेणार आहे?’ ‘मला स्वत:चाच एक उद्योग उभारायचा आहे, पप्पा! मी दर महिन्याला इतर कोणाकडून ठरावीक दिवशी ठरावीक पगार घेणार नाही तर एक माणसाला का होईना पण मी पगार देणार! हे लक्षात ठेवा.’ मंगेश आवेशात पप्पांना म्हणाला. ‘अरे मंगेशा, मग इतका शिकलास कशाला? आणि हो अरे पैसे कुठून आणणार आहेस?’ मंगेशचे पप्पा मंगेशला काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘अहो पप्पा, तुमची पिढी काय फक्त शंकाच काढत बसणार का? मनोज तिरोडकरांना कोणी पैसे दिले होते? पण ते तर त्यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून अनिल अंबानीची कंपनी विकत घ्यायला निघाले होते.’ मंगेश चढय़ा स्वरात म्हणाला. ‘असं म्हणतोस? खरे तर मलाही नोकरीऐवजी उद्योग करायची सुप्त इच्छा होती. पण त्या वेळी फार विरोध झाला असता, शिवाय माहिती मिळणं सोपं नव्हतं, इतरांची मोनापोलीच असल्यासारखं होतं. आता बराच बदल झाला आहे, असं वाटतंय. चल तू प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी आहे.’ मंगेशचे पप्पा म्हणाले.

मंगेश व त्याच्या पप्पांमधील हा संवाद काल्पनिक असला तरी आज मोठय़ा प्रमाणात मराठी घरात तो नक्कीच होतो आहे. मराठी तरुणांच्या व त्यांच्या कुटुंबाच्याही मानसिकतेत हा सुखद बदल होताना दिसतोय. आज जवळपास प्रत्येक मराठी वृत्तपत्रात दर आठवडय़ाला एक करिअरसंबंधी स्पेशल पुरवणी असते. त्यात मुख्यत: स्वयंरोजगार उद्योगाविषयी सविस्तर माहिती असते. शिवाय इतर किती तरी मराठी मासिके आज उद्योग, व्यापार, व्यवसाय, स्वयंरोजगार याविषयी निघतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज मराठी नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीबरोबर मराठीत मॅनेजमेंटचे धडे, यशाचा महामंत्र, सक्सेसचा- ब्ल्यू प्रिंट, यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती, तसेच व्यवसाय आणि उद्योगासंबंधी मार्गदर्शनाचे तीन-तीन तासांचे आणि काही तर दिवसभराचे कार्यक्रम आज शिवाजी मंदिर, कर्नाटक संघ हॉल, रवींद्र नाटय़ मंदिरात होत असतात आणि ५०० रुपयांची तिकिटं घेऊन ते बघायला आणि ऐकायला मोठय़ा प्रमाणात मराठी तरुण येत आहेत, पण बघायला आणि ऐकायला येत आहेत म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होईल! कारण पुढे जाऊन हे धडे अंमलात आणण्याच्या निश्चयाने ते अशा कार्यक्रमांना जातात. त्यांचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन खरंच वाखाणण्याजोगा आहे. मला वाटतं अशा मुलांच्या पाठीशी त्यांच्या पालकांनी आणि खरं तर संपूर्ण मराठी समाजानेच खंबीरपणे उभं राहायला हवं.

आजच्या तरुणांना इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्राची जगभरातील माहिती उपलब्ध आहे. नव्हे माहितीचा पूर आलेला आहे आणि म्हणून त्यांच्या विचारांना एक दिशा दिसते. स्वत: काही तरी करण्याची मनीषा दिसते. त्यातच सव्‍‌र्हिस सेक्टरमुळे तर स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी आज उपलब्ध केल्या आहेत. म्हणूनच आजच्या तरुणांचा ‘नोकरी’ करण्यापेक्षा काही तरी स्वत: निर्माण करण्याकडे कल असतो आणि तो योग्यच आहे, असं मला वाटतं. ज्यांना आज स्वत: काय करायचं आहे हे चांगलं ठाऊक असेल, तयारी झालेली असेल त्यांनी तर निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीने जगाशी बोलावं! इतर तरुण ज्यांना काही तरी उद्योग करून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे ते दोन प्रकारांत मोडतात, १) असे तरुण ज्यांनी कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे मनाशी ठरवलेलं आहे, पण त्यांना नेमकी सुरुवात कुठून करायची हे ठाऊक नसतं आणि २) ज्यांना कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा आहे हेच माहीत नाही, तरी त्यांनासुद्धा नोकरी न करता स्वत:च काही तरी करायची अशी एक जबरदस्त इच्छा असते. अशा तरुणांनी सुरुवात कशी करावी याचा थोडा विचार करूया.

मला वाटतं ज्यांनी स्वत:चा कल ओळखून कुठला उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा कोणत्या 
सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये काम करायचं आहे हे ठरवलं असेल आणि सुरुवातीला लागणारं ज्ञान आणि अनुभव त्यांच्याकडे असेल त्यांनी खुशाल स्वत: उद्योग सुरू करावा. आज बहुतेक तरुणांचा कल हा ज्ञानाधारित उद्योगाकडे किंवा सव्‍‌र्हिस सेक्टरकडे जास्त असतो.  त्यात इंटिरिअर्स, फाइन आर्ट, प्रिंटिंग, फॅशनस इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग, कोचिंग क्लासेस, मॅनेजमेंट कोर्सेस, अ‍ॅनिमशन, मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, कॉम्प्युटर क्लासेस, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम, रेस्टॉरंट्स, ब्रॅण्ड मेकिंग, मार्केटिंग असे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. अगदी छोटा तर छोटा, पण उद्योगाची सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवातीला एक चांगला अभ्यासपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट, नियोजन म्हणजे प्राथमिक तयारी करणं गरजेचं आहे.

‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ म्हणजे उद्योगाचा ब्लूप्रिंट! प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सुरुवातीचं भांडवल, उत्पादनाचा खर्च, कच्चा माल कुठे आणि कसा मिळणार, प्रोडक्ट ब्रॅण्ड, मार्केटिंग प्लान, प्रॉफिट-मार्जिन, तुमचे स्पर्धक, त्यांचे उत्पादन अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. आज इन्टरनेटवर कुठल्याही उद्योगात भारतात आणि भारताबाहेर कोण आहे, त्यांचे उत्पादन, त्यांचे ब्रॅण्डस् व त्यांची जवळपास संपूर्ण माहिती उपलब्ध असते. असा प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटला दाखवा म्हणजे तो तुम्ही केलेले कष्ट आणि लावलेल्या पैशावर योग्य रिटर्न काय असू शकतं हे सांगू शकतो. उद्योग सुरू केल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टमधील तुमचा अंदाज चुकला तरी फारसं बिघडत नाही. त्यातूनही आपल्याला खूप काही शिकता येतं. त्याचबरोबर संपूर्ण उद्योगाच्या सुरुवातीचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. चांगलं तपशीलवार नियोजन म्हणजे अर्ध यश हे लक्षात घ्या.

आता तुम्ही कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवलं नसेल आणि तरी तुम्हाला नोकरी न करता एखादा स्वतंत्र व्यवसायच करायचा असेल तर तुम्हाला जरा जास्त मेहनत करायला पाहिजे, हे नक्की. प्रथम तुमची आवड आणि क्षमता याची तुम्हालाच नीट ओळख होणं गरजेचं आहे. त्यात येणारी प्रत्येक संधी ओळखता येणं महत्त्वाचं आहे. जास्त गोंधळ असेल तर एखाद्या करिअर काऊन्सेलरशी बोलणं केव्हाही चांगलं. कारण जोपर्यंत तुमचे गुण, दोष, मानसिक ताकद तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत नेमका कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे तुम्ही ठरवू शकणार नाही. मित्रांशी आणि घरच्यांशी चर्चा जरूर करा पण त्याचबरोबर विविध उद्योगातील अनुभवी लोकांचा आपण सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत कुठल्याही निर्णयापर्यंत येऊ नका. झटपट उत्तरांच्या मागे न पडता प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार झाला पाहिजे. उद्योगाचे चांगले आणि वाईट सगळे मुद्दे लिहून काढलेले केव्हाही चांगलं. थोडं थांबून, अनुभव घेऊन मग पुढचा विचार करा. अनुभव मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जो उद्योग करायचं मनाशी ठरवलं असेल, त्या उद्योगात नोकरी करून प्रत्यक्ष माहिती मिळवणं केव्हाही चांगलं. कारण स्वत:चा अनुभव हाच आपला सगळ्यात मोठा शिक्षक असतो! पण सावधान, नोकरीतील त्या सुरक्षित व नियमित पगाराच्या जाळ्यात अडकण्याचा मोह होऊ देऊ नका. एकदा विचार पक्का झाला की, हर हर महादेव म्हणत पुढेच व्हा! मग मागे हटणे नाही! जीव तोडून कामाला लागा, यश हमखास तुमचं असेल. एखाद्या विशिष्ट उद्योगाची माहिती मिळवण्याचा एक मार्ग आपण बघितला. उद्योग कसा करावा याच व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षण घेता आलं तर फारच उत्तम. मुख्य म्हणजे सकारात्मक विचार आणि स्वत:वरचा सकारात्मक विश्वास केव्हाही डगमगता कामा नये. यश हे अपघाताने मिळत नसतं, की आकाशातून पडून, ते मिळतं आपल्या कर्तत्वाने!

एकदा उद्योग सुरू करण्याआधी आपण प्रथम त्यात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करतो आणि म्हणून कधी कधी आपण चांगल्या निर्णयापर्यंत येतच नसतो. मला असं वाटतं की, कुठल्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट विचार करताना सुरुवात ही सकारात्मक विचारानेच करावी, पण निर्णयापर्यंत येण्याआधी त्यामधील वाईट गोष्टींचादेखील वस्तुनिष्ठपणे विचार झाला पाहिजे. म्हणजे hope for the best but prepare for the worst! आपल्या स्वप्नांना नेमकं कुठे आणि कशामुळे ब्रेक लागत आहे याचा भावनेला लांब ठेवून नीट विचार झाला पाहिजे. मुख्य म्हणजे स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे! यशासाठी ‘डोळसपणे’ धोका पत्करणं अपरिहार्य असतं. त्याला फक्त धोका नाही तर हिशेबी धोका म्हणतात- कॅलक्युलेटेड रिस्क. हे तत्त्वही व्यवस्थापन शास्त्राचा एक भाग आहे. उद्योग सुरू केल्यावर काही पेचात टाकणारे निर्णय घेत राहावे लागतात. असे निर्णय चुकले तरी न घाबरता पुढे जा. यशस्वी माणसंदेखील पुष्कळ वेळा चुकीचे निर्णय घेतात!

शेवटी एकच सांगेन नुसती चर्चा किंवा विचार करून कुणी उद्योजक होणार नाही. संधी येताना फार छोटी वाटते पण गेल्यावर ती फारच मोठी दिसते! जग काय म्हणेल याचा विचार करण्याची आजच्या जगात तरी कोणी चूक करू नये. जे प्रोत्साहित करतील त्यांना धन्यवाद देऊन व जे नाउमेद करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. शंका काढणारे १०० लोक भेटतील, तर नाउमेद करणारे २००! टीकेपेक्षा टीका कोण करतो हे मह्त्त्वाचं असतं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर कुणाविषयी कडवटपणा किंवा तिरस्कार धरून न ठेवता शांतपणे पुढे जाण्यातच आपलं यश आहे.

अडचणी आणि अडथळे हे येणारच म्हणून आपण प्रयत्नच करणार नाही का? माझ्या मते यशस्वी प्रयत्न म्हणजेच १००% यश! चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते, पण अनायासे दिवाळीचा मुहूर्त आहे तर पहिलं पाऊल तर उचला, म्हणतात ना, Journey of a thousand miles begins with a single step. 

Nitin Potdar
http://www.myniti.com/


go back to list
catagories

मित्रांनो! व्यवसायात निगरगट्ट राहा.

12/10/2015

 
Picture

मराठी तरुणांना उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी व्यवहारांत स्पष्टता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. ‘भीड भीकेची बहीण’ किंवा ‘बोलणार्
याची मातीही खपते,पण न बोलणार्याचे मोतीही खपत नाहीत’, अशा म्हणी मराठी भाषेत असतानाही आपण त्यांचे महत्त्व ओळखत नाही. व्यावसायिकासाठी मुखदुर्बळता नेहमीच नुकसानकारक ठरते. म्हणूनच धंद्याची उमेद असणार्या मराठी तरुणांना माझे पहिले सांगणे असते, ‘मित्रांनो! व्यवसायात निगरगट्ट राहा.’ 

इतिहासाकडे बघताना मला खूपदा जाणवते, की आपण इंग्रजी भाषा, आधुनिक राहाणी शिकलो, इमाने इतबारे कारकुनी करायला शिकलो, पण इंग्रजांची धूर्त व्यापारी वृत्ती शिकलो असतो तर किती बरे झाले असते! स्वतःची किंमत न ओळखण्याची किंवा वेळप्रसंगी ती किंमत स्पष्टपणे न सांगण्याची चूक मराठी माणसे प्रदीर्घ काळ करत आली आहेत. 

याचा एक दुष्परिणाम आजही दिसतो, की उद्योगधंद्यात मराठी माणूस स्वतःची, आपल्या सेवेची किंवा उत्पादनांची किंमत स्पष्टपणे सांगायला कचरतो. आपण बिझनेसमन आहोत, हे लक्षात ठेवले तरच व्यवसायात पुढे जाता येऊ शकेल. पण आणखीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे व्यवहारात स्पष्टता बाळगणे म्हणजे फटकळपणा नव्हे. शहाणपणा व अतिशहाणपणा यात जितके अंतर आहे, तितकेच ते रोखठोक बोलणे व उर्मटपणे बोलण्यात आहे. अनेक मराठी व्यावसायिक याच दुर्गुणामुळे टीकेचे धनी होताना दिसतात. 

​मी माझ्या व्यवसायात खुर्चीवर बसल्यावर मराठीपण विसरुन निगरगट्ट बनतो. समोरच्याकडून माल विकत घेताना, तो कमीतकमी किंमतीत मिळवण्याबाबत कठोर असतो. मात्र तोच माल ग्राहकांना विकताना मी निर्मळ आणि गोड असतो. यामागे साधे तत्त्व आहे, की मला नफा घेऊनच विक्री करायची असते. अन्यथा स्वतःचा आणि इतरांचा चरितार्थ कसा चालवणार? व्यवहाराची चर्चा किंवा आर्थिक देवाण-घेवाण मी कधीच गुळमुळीतपणे करत नाही, पण तेच माझ्या कामगारांबरोबर वागताना मी स्वतःला त्यांच्यातीलच एक समजून बोलतो. त्यामुळे त्यांना आत्मीयताही वाटते.

Dhananjay Datar


go back to list
catagories