Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

5 कोटींचे खेकडे निर्यात करणाऱ्या गुणाबाई

1/14/2016

 
मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपण शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दाखवून दिलंय नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार या महिलेनं…महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त नैसर्गिकरित्या खेकड्यांचे उत्पादन करणारं राज्य आहे. याचाच फायदा घेत गुणाबाईंनी खेकड्यांची निर्यात करत परदेशातील बाजारपेठ गाठली आहे.

या आहेत नवी मुंबईतील वाशी गावात राहणार्‍या गुणाबाई…शिक्षण फक्त पहिली…पण वयाच्या 8 व्या वर्षांपासून खेकडे पकडण्यात त्या अगदी माहिर.. 40 वर्षांपासून गुणाबाई नवी मुंबईतील खाडी किनार्‍यावर फळीवरुन खेकडे पकडून मुंबईत विकायच्या…सुरुवातीला सव्वा रूपयात एक डझन खेकडे विकणारी गुणाबाई आज वर्षांकाठी 5 कोटी रुपयांची खेकड्यांची निर्यांत करते. विशेष म्हणजे वडील पती भावंड या कोणाची साथ नसताना ही मजल गुणाबाईने गाठलीये.

नवी मुंबईतील खाडी किनार्‍यालगत असलेल्या तलावात गुणाबाई राज्यभरातील कच्चे खेकडे सोडून पारंपरिक पद्धती हा व्यवसाय करतात. यातून त्यांना 4 महिन्यात अडीच ते तीन किलोचे पक्के खेकडे मिळतात आणि नंतर याच खेकड्यांवर स्वत:च्या कोल्डस्टोरेजमध्ये प्रक्रिया करून निर्यात केली जाते.
महाराष्ट्रातला 100 टन खेकड्याचा कच्चा माल आंध्रप्रदेशात जात होता. आणि तिथे खेकडे पक्के करून चेन्नई मार्गे निर्यात होत होती. पण आता या पैकी 70 ते 80 टन खेकडा गुणाबाई आणि तिचा मुलगा सुभाष निर्यात करतात.

कोकण किनारपट्टीवर खेकड्यांच्या उत्पादनाला पोषक वातावरण आहे. नवी मुंबईतील पाचशे तलावांची एमपेडाच्या माध्यमातून पाहणी झालीये. या सर्व तलावातून शेकडो टन खेकड्याच उत्पादन होवू शकतो.
आज गुणाबाई 100 ग्रँमचे कच्चे खेकडे घेवून तीन किलोचे पक्के खेकडे तयार करते. तेव्हा त्यांना एका किलो मागे 30 डॉलर मिळतात. जर महाराष्ट्र सरकारने तामिळनाडू सरकार प्रमाणे सुविधा दिल्यातर महाराष्ट्र खेकडे निर्यातीमध्ये अव्वल स्थानी असेल. कारणं परदेशात महाराष्ट्रातल्या खेकड्यांना मागणी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना रोजगारही नवीन संधी उपलब्ध होईल.

-विनय म्हाञे, नवी मुंबई
Source : http://www.ibnlokmat.tv/archives/19970


GO BACK TO LIST
CATEGORIES