Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही घडत असतं !

12/9/2015

 
Picture
​एक २४ वर्षाचा मुलगा, ट्रेन मधुन जात असताना ओरडला, "बाबा, ते पहा ! झाडं आपल्या मागे मागे जात आहेत !"

वडील आपल्या मुलाचा उत्साह पाहून गहीवरुन हसले. समोरच्याच बाकावर बसलेल्या एका जोडप्याला मात्र त्या मुलाचं वागणं जरा विचित्र आणि बालिश वाटलं.

पुन्हा एकदा तो मुलगा तेवढ्याच उत्साहाने म्हणाला,

"बाबा, बघा ना , हे सर्व ढग आपल्या सोबत पळत आहेत !"

यावेळेला मात्र समोर बसलेल्या जोडप्याने न राहवून मुलाच्या बाबांना विचारलं

तुमचा मुलगा एवढा मोठा झाला आहे आणि तरीही अगदी लहान मुलासारखा वागतो, याला तुम्ही डॉक्टर कडे का नाही घेउन जात ?

तो म्हातारा मनुष्य किंचीतसं हसत म्हणाला,

"त्याला डॉक्टरकडेच घेऊन गेलो होतो. आजच त्याला हॉस्पीटल मधून डीसचार्ज मिळालाय. तो लहान पणापासूनच आंधळा होता. आजच त्याचे डोळे ठीक झालेत."

........प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही घडत असतं. तेव्हा अगदी पुर्ण माहिती असल्याशिवाय कोणाबद्दलही मतप्रदर्शन करु नका. सत्य कदाचित खुपच वेगळं असू शकेल !


go back to list
catagories