Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

पैशांचा माज

12/12/2015

 
Picture
Hinduja हॉस्पिटलमधुन एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल आला... खुप घाई करून तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये पोहोचला... त्याने पटकन सगळ्या नर्सला ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितले, स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन ऑपरेशन थिएटर जवळ आला...

तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे वडिल , जे कि वडिलोपार्जित गर्भश्रीमंत होते ते हॉल बाहेर रागात चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट पाहताय...

डॉक्टरांना पाहताच त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व ते रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे यायला इतका वेळ का घेतला? तुम्हाला कळत नाही का माझ्या मुलाचे प्राण धोक्यात आहे ते? तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव आहे की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत म्हणाला "मला माफ करा, मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन आल्यानंतर
जितक्या लवकर येता आले तितक्या लवकर आलो, आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत व्हा..
मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा??” वडील म्हणाले , “जर तुमचा मुलगा आता ऑपरेशन थिएटर मध्ये असता तर?? जर तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु च्या जबड्यात असता तर तुम्ही काय केल असतं??" वडील रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत म्हणाले "कोणत्याही प्रकारचे पापकर्म न करणे व सर्व प्रकारचे कुशलकर्म करणे अशी शिकवण देणाऱ्या तथागताचा मी उपासक आहे...आता तुम्ही शांत व्हा व समस्त प्राणिमात्राविषयी मैत्रिभावना करा... मी माझे पुर्ण प्रयत्न करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेला तसे वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात
राहिले
आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात बाहेर आले आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले
"अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...तुमच्या पुण्यकर्माचे फळ व आमचे प्रयत्नांनी मुलाचे प्राण वाचले"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला...
त्यांनी डॉक्टर ना धन्यवाद दिले.. डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणी ते
तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग श्रीमन्तीचा पडदा पडलेल्या वडिलांना आश्चर्य झाला आणि ते शेजारी उभ्या असलेल्या नर्स
ला रागात म्हणाले "किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल अपघातात वारला... आज ते त्याचा अंतिम
संस्कार करत होते जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी फोन केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम संस्कार अर्धवट सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी आले आणि आता अंतिम संस्कार पुर्ण करण्यासाठि पटकन गेले... अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक मुलगा मेला तो काय गर्व
आणि माज करणार?"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सुन्न झाले..आणि त्यांना खुप पश्चाताप झाला...

सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये कारण तुम्हाला नसतं माहित त्याने
काय भोगलय...


जर हा मजकूर वाचून मनाला थोडंसं तरी पटलं असेल तर नक्कीच विचार करा आणि ह्याविषयी इतरांना कळवा . . 

पैसा सर्वच नसतो, माणुसकी जपा


( श्री. पांडुरंग बबन मोरे यांच्या सौजन्याने)
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

Source


Go back to list
Catagories