Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

मायक्रोसॉफ्ट वर्ड -की बोर्ड शॉर्टकट्स

12/4/2015

 
  1. एखाद्या मोठ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये काम करताना जर सर्वात पहील्या ओळीवर अथवा सर्वात शेवटच्या ओळीवर जायचे असेल तर अनुक्रमे ctrl + Home आणि ctrl + End दाबावे.
  2. लिहिलेल्या मजकुराला अधोरेखीत (Underline) करायचे असल्यास ctrl + U दाबावे हे आपल्याला माहीत असेलच पण जर त्याच मजकुरास दोनदा अधोरेखीत (Double underline) करायचे असेल तर त्या मजकुरास सीलेक्ट करुन Ctrl + Shift + D दाबावे.
  3. मजकुराची मुद्देसूद मांडणी करताना बुलेटींग करावे लागते. अशा वेळेस सर्व मुद्दे एकाखाली एक असे मांडुन घ्यावेत आणि मग त्यांना एकत्र सीलेक्ट करुन Ctrl + Shift + L एकत्र दाबावे.
  4. कधी एखादा कॅपीटल मधील मजकुर स्मॉल लेटर्स मध्ये किंवा स्मॉल लेटर्स मधील मजकुर कॅपीटल मध्ये बदलावा लागतो. यासाठी आधी तो मजकुर सीलेक्ट करुन मग Shift+F3 दाबावे.
    - Shift+F3 एकदा दाबल्यावर सर्व मजकुर कॅपीटल मध्ये रुपांतरीत होतो
    - Shift+F3 दुसर्‍यांदा दाबल्यावर सर्व मजकुर स्मॉल मध्ये रुपांतरीत होतो
    - Shift+F3 तीसर्‍यांदा दाबल्यावर सर्व शब्दांचे पहीले अक्षर कॅपीटल मध्ये आणि इतर सर्व अक्षरे स्मॉल मध्ये रुपांतरीत होतात.

  5. मायक्रोसॉफ्ट एक्सेल प्रमाणेच वर्ड मध्ये देखील कॉलम्स लपलेले असतात. वर्ड मधील कॉलम सीलेक्ट करायचा असेल तर Alt बटण दाबुन ठेवावे आणि सोबत माउसच्या डाव्या बटणाच्या सहाय्याने ड्रॅग करावे.

​अजुन खुप शॉर्टकट्स आहेत. नंतर सवडीने सांगेन पण त्याआधी आजच्या लेखातील शॉर्टकट्सचा सराव करायला घ्या.


Go Back to List
Catagories