Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

Rule of 72

12/5/2015

" माझ्याकडे एक चांगली इंन्वेस्टमेंट स्कीम आहे. म्हणजे बघा, तुम्ही १०००० रुपये गुंतवायचे आणि केवळ दोन वर्षात तुमचे पैसे दुप्प्ट होणार. तेच पैसे पुन्हा गुंतवलेत तर आणखी दोन वर्षांत तेही दुप्पट होतील."

मित्रहो, असे बिचकु नका. मी काही तुम्हाला कोणती इन्व्हेस्टमेंट स्कीम विकणार नाही. तुमच्या इतकाच मला देखिल या "स्कीम"वाल्यांचा त्रास होतो. पण अशा दामदुपटीच्या स्कीम्स सांगणारा कोणीतरी कधीतरी आपल्या प्रत्येकाला भेटलेला असतोच. मी फक्त तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे जिचा वापर करुन खरेच तुमचे पैसे दुप्प्ट होणार का (?) आणि कधी ? याचा अंदाज तुम्ही स्वतःच लावु शकता.

या युक्तीचे नाव आहे Rule of 72. बँकींग किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणार्‍या बर्‍याच जणांना Rule of 72 माहित असेलंच.

Rule of 72 हा तुम्ही गुंतविलेली रक्कम साधारण किती वर्षातं दुप्पट होईल हे ठरविण्यासाठीचा सोपा उपाय आहे. गुंतवीलेल्या रकमेवर मिळणार्‍या वार्षीक व्याजदराने ७२ या संख्येला भागल्यास मिळणारे उत्तर म्हणजे मुळ रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी (वर्षे).
उदाहरणार्थ जर १०००० रुपये १०% वार्षिक  व्याजदराने गुंतविले तर ते दुप्पट होण्यास ७२/१० = ७.२ वर्षे लागतील.

Rule of 72 हा एक ढोबळ नियम आहे. हा नियम वापरुन अगदी अचुक उत्तर मिळत नाही मात्र बर्‍यापैकी बरोबर उत्तर मिळते. मुख्य म्हणजे ६% ते २०% या व्याजदरांसाठी हा नियम खरोखरच्या उत्तराच्या अगदी जवळचे उत्तर देतो. (व्याजदरांचा पल्ला साधारण इतकाच असतो.) 

Rule of 72 चे आणखी काही उपयोग - 

आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे जर चलनवाढीचा दर (Inflation Rate) माहित असेल तर हाच Rule of 72 वापरुन आपण रुपयांची भविष्यातील किंमत (Future value of money) ठरवु शकतो. उदाहरणार्थ जर चलनवाढीचा दर (Inflation Rate) ३% इतका असेल तर २४ वर्षांनी (७२/३ = २४)  आजच्या रुपयांची किंमत अर्धी झालेली असेल.

आणखी एक उदाहरण देतो. जर लोकसंख्यावाढीचा दर प्रतीवर्षी २% इतका असेल तर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. पण हाच दर जर ३% असला तर लोकसंख्या दुप्पट होण्यास फक्त २४ वर्षे लागतील. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की सरकारतर्फे करण्यात येणार्‍या विविध गणना आणि सांख्यीकींचा भविष्यातील तरतुदींवर किती परीणाम होउ शकतो. लोकसंख्यावाढीचा दर ठरवण्यात झालेली थोडीशी चुक भविष्यातील सर्व योजनांना फोल ठरवु शकते.

मित्रांनो यापुढे कोणी जर तुम्हाला दामदुपटीची स्कीम सांगु लागला तर पहिल्यांदा त्यास परताव्याचा वार्षीक व्याजदर किती असेल ते विचारा (तसे लिहुन घ्या), मग रक्कम दुप्पट होण्यास कीती कालावधी लागेल ते स्वतःच ठरवा आणि मगच आपले मेहनतीने कमावलेले पैसे गुंतविण्याचा निर्णय घ्या.

GO BACK TO LIST
CATAGORIES

बघा जरा पटतय का ते ???

12/5/2015

Picture
असं समजा की एक 2BHK फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक तुम्हाला त्याच्या एकूण किमतीच्या ८५% कर्ज देऊ करत आहे. आपण धरून चालु कि हे कर्ज आपण २० वर्षांसाठी घेतो आहे. आणि आता खाली दिलेले "calculation " पहा.
घर घेण्यासाठी तुम्ही स्वतः दिलेले contrbution १५% : रुपये ७.५ लाख ( यामध्येच सगळी बचत/जमापुंजी संपुन जाते !)
गृह कर्ज : रुपये ४२.५ लाख

दरमहा येणारा EMI (व्याजदर ११%) : रु .४७०००
maintenance charges दरमहा : रु .२०००
मालमत्ता कर दरमहा (Property tax) : रु .१०००-१५००

गृह कर्ज व्याजावर मिळणारी कर सवलत : दरमहा रु .४००० ( ते ही फक्त पहिल्या काही वर्षांपर्यंतच )
म्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५००००
(मेंटेनन्स चार्जेस आणि कर हे भविष्यात महागाई दराप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.)

आणि दरमहा एवढे सगळे पैसे दिल्यानंतर -
१. प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबाला खरेदीसाठी नकारघंटा ऐकावी लागणार (जरी तुमचा पगार ७० ते ८० हजार असेल तरी)
२. पहिल्या काही वर्षांसाठी तरी खर्चावर संपुर्ण नियंत्रण , Family holiday आणि नविन गाडीचा प्लान पुढे ढकलला जाणार :-)
३. आणि जर या काळात नोकरी गेली, कामावरुन बडतर्फ केले (जे मंदीच्या काळात हमखास होते !) तर तुमची आर्थिक गणिते अशी काही बिघडतील की काही खैर नाही.

२० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड
आणि एवढे सगळे करुन करून तुम्हाला काय मिळालं तर एका २० वर्ष जुन्या असलेल्या society मधला एक २० वर्ष जुना झालेला फ्लॅट. २० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल. आणि 20 वर्षात एका घराशिवाय काहिही मिळाले नसेल.

हेच घर जर तुम्ही घर भाडयाने घेतले तर तुम्हाला जास्तित जास्त घरभाडे १०००० येईल. इतर सगळा खर्च मिळून , आणि असं समजून चालूया की भाडे दरवर्षी ८% दराने वाढेल ( खरे तर कमीच वाढेल). प्रतीवर्षी तुम्ही दिलेलं घरभाडे असेल १.२ लाख, १.३ लाख, १.४ लाख.........
याच दराने २० वर्षांनंतर तुम्ही भरलेलं एकुण भाडे असेल ................फक्त ६० लाख.

फायदे -

१. तुम्ही कधीही घर बद्लु शकता. अगदी एखाद्या छोट्याशा कारणासाठी देखिल !
२. अचानक परगावी किंवा परदेशी स्थायीक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही सहजगत्या ती संधी स्वीकारु शकता.
३. आपल्या सोयीनुसार ऑफीसच्या जवळ, मुलांच्या शाळेच्या जवळ घर घेऊ शकता.
४. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी 3BHK फ्लॅट कधीही घेउ शकता.
५. राहत्या घराचे भाडे जसजसे वाढेल त्यानुसार HRA मध्ये कर सवलतही मिळेल.
आता जर तुम्ही "हुशार" असाल तर काही पैसे शेअर बाजारात किंवा Mutual fund मध्ये गुंतवाल कारण तुम्ही फक्त रुपये १०००० घरभाडे देत आहात, ५०००० EMI नाही.

जर तुम्ही २० वर्षांपर्यंत १५% दराने दरमहा रुपये २५००० गुंतवले ( उदाहरणार्थ तुम्ही जागा खरेदी करा किंवा Mutual Fund, PPF मध्ये गुंतवा.) जसे तुमचे घरभाडे वाढेल तसे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करु शकाल, आणि तरी सुद्धा तुम्ही २.५ करोड या २० वर्षात कमवु शकता ( हे तुमच्या SMART गुंतवणुकीवर अवलंबून आहे.)

आणि नंतर तुम्ही असाच एखादा FLAT तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता.

GO BACK TO LIST
CATAGORIES

वॉरन बफे यांचा मोलाचा सल्ला

12/5/2015

वॉरन बफे या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने नुकताच ३१ बिलीयन डॉलर्स सामाजीक कार्यासाठी दान केले. त्यांच्या सी.एन्.बी.सी. (CNBC) या वाहीनीवर झालेल्या मुलाखतीतील, त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपुर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा भाग खास तुमच्यासाठी, ते देखिल मराठीत -

१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षा रक्षकांची गरज नाही.

५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. पण ते कधीही स्वतंत्र विमानाने प्रवास करत नाहीत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७. त्यांना इतर उच्च वर्गीयांबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफेंबरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत.तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."

-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.

GO BACK TO LIST
CATAGORIES

वॉरन बफेंची मुलाखत